Home » Entertainment » अल्पविराम - Alpaviram 31st Mar 2020 First Marathi Live Series with celebrities |#MarathiLive #IMEPL

अल्पविराम - Alpaviram 31st Mar 2020 First Marathi Live Series with celebrities |#MarathiLive #IMEPL

Written By IME World on Tuesday, Mar 31, 2020 | 01:36 PM

 
आजच्या अल्पविरामच्या भागात आपल्याला भेटतील: अभिनेता - प्रियदर्शन जाधव अभिनेत्री व कवयित्री - स्पृहा जोशी गायिका - प्रियांका बर्वे दिग्दर्शक - समीर विद्वांस सूत्रसंचालन - मृण्मयी गोडबोले In today’s episode, we have Actor - Priyadarshan Jadhav Actress and Poet - Spruha Joshi Singer - Priyanka Barve Director - Sameer Vidwans Anchor - Mrinmayee Godbole 'अल्पविराम' - कोरोनामुळे आपल्या सगळ्यांचेच आयुष्य थोडेसे थांबले आहे, जणू आपल्या आयुष्याने एक 'अल्पविराम' घेतला आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे आपण सर्वजण 'सोशल डिस्टंन्सिंग पाळतो आहोत. पण या काळातही वेबच्या माध्यमातून आपण एकत्र येऊ शकतो! याच विचाराने इंडियन मॅजिक आय प्रायव्हेट लिमिटेडने 'अल्पविराम' हा कर्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमात रोज नवे कलाकार तुम्हाला भेटतील त्यांच्या नव्या कलाविष्कारांसह, रोज संध्याकाळी ६ वाजता! कविता, लघुकथा, लेख, गाणी, संगीत, नृत्य, प्रहसन, विडंबन, बोलक्या बाहुल्यांचे खेळ, जादूचे प्रयोग, धमाल किस्से यासारख्या कलाप्रकारांनी नटलेला 'अल्पविराम' रसिकांना मनोरंजनाची अनोखी मेजवानी देईल हे नक्की! लेखक, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून आपण प्रिदर्शन जाधव याना ओळखतोच. त्यांच्यातल्या विनोदी अभिनेत्यावर सर्व प्रेक्षकांचं मनापासून प्रेम आहे. आजच्या भागात ते असेच काही नर्मविनोदी सादरीकरण आपल्यासमोर सादर करतील. स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री व कवियित्री म्हणून आपल्याला परिचित आहेत. आजच्या कार्यक्रमात त्या आपल्याला काही कविता वाचून दाखवतील. आजची अल्पविरामची मैफिल सुरांनी सजवायला गायिका प्रियांका बर्वे आपल्यासोबत आहेत. समीर विद्वांस याना आपण आजचा आघाडीचा दिग्दर्शक म्हणून ओळखतो. पण आज ते आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत भेटणार आहेत. पाहूया काय आहे त्यांचे आजचे सादरीकरण! मृण्मयी गोडबोले यांना आपण एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून चित्रपट, मालिका, वेब सिरीज अशा विविध माध्यमांतून पाहात आलो आहोत. 'अल्पविराम' मध्ये त्या सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. असा हा आजचा 'अल्पविराम' खास तुमच्यासाठी! हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला कंमेंट्समध्ये जरूर सांगा! Due to COVID-19, our busy lives have stopped - our lives have taken 'Alpaviram'! ‘Alpaviram’ is a unique initiative started by Indian Magic Eye Pvt. Ltd. to entertain people in times of social distancing mandated for COVID-19. Alpaviram is a platform that brings artists and their audiences close through digital media. A new artist will be there to interact with you every day, at 06:00 PM. From poems and short stories, to comedy, parody, music and much more, Alpaviram is a platform for artists from various backgrounds. Writer, Actor and Director - Priyadarshan Jadhav is a beloved actor. Today, he will perform and make us all smile once again! Spruha Joshi is an excellent actress and poet who will recite some poems for us today. Singer Priyanka Barve will be signing for us all. Sameer Vidwans is a well-known director who will be a part of today’s Alpaviram episode! We have all seen the well-known actress, Mrinmayee Godbole in various movies, serials, and web series. She will be compering for 'Alpaviram'! See how all the stories unfold in today’s Alpaviram episode! Let us know what your favorite moments are in the comment section below. Get Connected with us on Facebook: https://www.facebook.com/IMEPL Visit our Website: https://www.imepl.com Subscribe to IME World for more entertaining content.